नवीन वर्षासाठी सर्वांचेच नवीन संकल्प असतात; परंतु यामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट असते, ती म्हणजे स्वतःचे गृहस्वप्न, कोरोना महामारीच्या जागतिक साथीने सुरक्षितता देणाऱ्या हक्काच्या घराचे महत्व आपल्याला पटले आहे. त्यामुळे खरोखरच जर आपण आपल्या गृहस्वप्नावर २०२० मध्ये गांभीर्यपूर्वक विचार केला असेल तर अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनच्या सहकार्याने सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात अथवा शहरालगतच्या भागात सर्व सुविधायुक्त फ्लॅट, प्लॉट, शॉपची आपण निर्धास्तपणे खरेदी करू शकतो.
Category Archives: Uncategorized
रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला नेहमीच चांगला परतावा मिळतो. आगामी काळात तर खूप चांगला परतावा मिळणे शक्य असल्याचा आशावाद अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनचे संचालक अमर बिराजदार यांनी व्यक्त केला आहे. कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा व्यापार स्थिरतेच्या दिशेने वेगाने निघाला असून व्यवसायिकांना आपल्या व्यवसायाला अधिक विस्तारण्यासाठी नव्या वसाहती आणि कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये दुकानगाळे खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेव्हलपर्स किंवा विकसक सवलती आणि विविध ऑफर आणतात. शिवाय अनेक खरेदीदार सणासुदीच्या प्रतीक्षेत असतात आणि विकासक त्यानुसार त्यांच्या विक्रीचे नियोजन करतात. देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यामुळे तुम्हालाही मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही राहण्यासाठी घर खरेदी करा किंवा गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवा, दोन्ही वावतीत सणासुदीचा काळ चांगला मानला जातो.
सोलापुरातील डेव्हलपर्स यांना त्यांचे प्लॅट अथवा ओपन प्लॉट विक्रीसाठी एकाच छताखाली उत्तम मार्केटिंगच्या योजना व विक्री च्या सेवा उपलब्ध करून देणे आणि सोलापुरातील ग्राहकांना शहरातील व शहरालगतच्या भागात उपलब्ध प्रकल्पाबद्दल योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना गुणवत्ता पूर्ण फ्लॅट, शॉप्स व ओपन प्लॉट देणे हाच अबिलिटी कन्स्ट्रक्शन चा मूळ उद्देश आहे.
होम लोनवर सर्वात कमी व्याजदर आहे. महिलांना करामध्ये सवलत, सरकार कडून प्रधानमंत्री आवस योजनेचे मिळणारे अनुदान, महिलांना रजिस्ट्रेशनमध्ये ०.५ टक्क्यांचे सवलत मिळते. महिलांना बँकेमार्फत कर सवलत आहे, यामुळे अनेकांना आपल्या स्वप्नातील घर घेणं आहे.