रियल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यासाठी उत्तम पर्याय

रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला नेहमीच चांगला परतावा मिळतो. आगामी काळात तर खूप चांगला परतावा मिळणे शक्य असल्याचा आशावाद अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनचे संचालक अमर बिराजदार यांनी व्यक्त केला आहे. कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा व्यापार स्थिरतेच्या दिशेने वेगाने निघाला असून व्यवसायिकांना आपल्या व्यवसायाला अधिक विस्तारण्यासाठी नव्या वसाहती आणि कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये दुकानगाळे खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. केवळ गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना आगामी काळात बँकांपेक्षा निश्चितच चांगला परतावा योग्य ठिकाणच्या जागेत मिळणार आहे. यासाठी मोक्याच्या ठिकाणाच्या बांधकाम प्रकल्पाबरोबरच नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी आणि डेव्हलपर्सच्या प्रकल्पांचा अभ्यास करावा असा सल्ला देखील अमर बिराजदार यांनी दिला आहे.